ग्रामसेवकाला पिता-पुत्राकडून बेदम मारहाण

Foto
औरंगाबाद : खासदार निधीतील मंजुरी मिळालेल्या सभामंडपाच्या देयकापोटी धनादेश का काढत नाही, असा जाब विचारत पिता-पुत्रांनी ग्रामसेवकाला मारहाण केल्याची घटना सोयगाव तालुक्यातील कंकराळा येथील ग्रामपंचायत कार्यालयात घडली.  
कंकराळा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रफुल्‍ल गोरे हे गुरुवारी कार्यालयात कामकाज करत असताना रवी पाटील व त्यांचा मुलगा सागर पाटील यांनी सभामंडपाच्या देयकाबाबत जाब विचारला. त्यानंतर त्यांनी वादावादी करत गोरे यांना बेदम मारहाण केली. गोरे यांनी सोयगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघा पिता-पुत्राविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  दरम्यान, सदरील ग्रामसेवक सभामंडपाच्या कामात धनादेश काढण्यासाठी हेतुपुरस्कर त्रास देऊन कमिशनपोटी दहा हजारांची लाच मागत असल्याची तक्रार रवी पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्याकडे केली आहे.
पोलिस निरीक्षक सुदाम शिरसाठ, जमादार संतोष पाईकराव, शिवदास गोपाळ, विकास लोखंडे, अविनाश बनसोडे, संदीप चव्हाण, सुभाष पवार आदी तपास करत आहेत.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker